Thursday, July 18, 2024
Homeदेशकोणाची ३२० तर कोणाची ५०० रूपये आहे नेटवर्थ, हे आहेत ५ सगळ्यात...

कोणाची ३२० तर कोणाची ५०० रूपये आहे नेटवर्थ, हे आहेत ५ सगळ्यात गरीब लोकसभा उमेदवार

मुंबई: लोकसभा निवडणुकीची(loksabha election 2024) तारीख जवळ येत आहे. १९ एप्रिलला मतदान सुरू होत असून ते सात टप्प्यात पार पडणार आहे. यानंतर मतमोजणी ४ जूनला केली जाणार आहे.

लोकसभेच्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. यात काही कोट्याधीश आहे तर काही अब्जाधीश.मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वात गरीब उमेदवार कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?

पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या सर्वात गरीब ५ उमेमदवारांबाबत बोलायचे झाल्यास यातील चार तामिळनाडूमधील आणि एक महाराष्ट्रातील उमेदवार आहेत.

निवडणूक आयोगाला दिल्या गेलेल्या माहितीमध्ये या उमेदवारांनी आपल्या संपत्तीबाबतही माहिती सादर केली आहे.

तामिळनाडूच्या Thoothukkudi मतदारसंघातून अपक्ष उमेदवार पोनराज के यांची नेटवर्थ केव ३२० रूपये इतकी आहे.

यानंतर कार्तिक डोके यांचा नंबर येतो. राज्यातील रामटेक मतदारसंघातून ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांची संपत्ती ५०० रूपये इतकी आहे.

तिसरे सगळ्यात गरीब उमेदवार तामिळनाडूच्या चेन्नई नॉर्थ येथून अपक्ष उभे असणारे सुरियामुत्थु आहेत. त्यांची संपत्तीही ५०० रूपये आहे.

तामिळनाडूच्या अरानी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जी दामोदरन यांची संपत्ती १००० रूपये आहे.

याशिवाय जे सेबेस्टिन यांनी आपली नेटवर्थ १५०० रूपये इतकी सांगितली आहे. आणि हे चेन्नई नॉर्थ SUCI(C)चे उमेदवार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -