नवी मुंबई : दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने तुर्भे स्टोअर्स विभागात दरवर्षीपमाणे यंदाही कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी सुमारे ८०० महिलांनी उपवास करत कलश यात्रेत सहभागी घेतला.
दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, छटपूजा आणि कलश यात्रा या धार्मिक कार्यक्रमासोबत रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखिल आयोजित करण्यात येतो.
संस्थेचे अध्यक्ष तथा उत्तर भारतीय सेनेचे नवी मुंबई संघटक कमलेश वर्मा यांच्या नेतृत्वाखाली निघालेली कलश यात्रा संपूर्ण तुर्भे स्टोअर विभागात फिरली. यावेळी सहभागी झालेल्या सर्व महिला व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
कलश यात्रेसाठी ट्रस्टचे राजाराम मौर्या, रमेश बैजू प्रसाद, बिजय सिंह, गिरधारी लाल गुप्ता, सुभाष सरोज, विद्याधर तिवारी, पप्पू गुप्ता, पन्नालाल गुप्ता, हंसराज, बबली माळी आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राजेश शिंदे, उत्तर भारतीय सेना जिल्हा संघटक कमलेश वर्मा, भारतीय जनता पार्टीचे सुरेश गायकवाड, मार्कन्डेय केवट, विश्व हिंदू परिषदेचे सुरेश राणा, उत्तर भारतीय सेना उपजिल्हा संघटक धर्मेन्द्र राजभर यांनी हजेरी लावली.