Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane: बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे नेणारे मोदीच

Nitesh Rane: बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे नेणारे मोदीच

उबाठा सेनेवर आमदार नितेश राणे यांचा पलटवार

मुंबई : हिंदू धर्माला खऱ्या अर्थाने मान मिळवून देणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने ताकद मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) करत आहेत. ते धर्म आणि अधर्माची लढाई लढणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत (sanjay raut) मोदींवर टीका करत असल्याबद्दल आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

आमदार राणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, उबाठामधील शहाणे व्यक्ती भांडुपमध्ये बसून शहाणपण शिकवत होते. ते म्हणजे संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, असल्याची टीका राणे यांनी केली. संजय राऊत म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटते. ज्या उद्धव ठाकरेंनी उभ्या आयुष्यात स्वतःवर साधी एनसी नोंदवून घेता आली नाही, त्यांना देशाचे पंतप्रधान घाबरणार का? ज्यांना पाकिस्तान चीन, मोठ्यातील मोठा अंडरवर्ल्ड, अतिरेकी घाबरतात ते पंतप्रधान मोदी असल्याचे राणे म्हणाले.

हिंदू नवनर्ष निमित्ताने ही लढाई धर्म आणि अधर्मामध्ये असल्याचे राऊत म्हणत आहेत. ज्या उद्धव ठाकरे यांना हिंदू बोलताना भीती वाटते, विचार करावा लागतो, ज्याची काँग्रेसच्या व्यासपीठावर हिंदू म्हणजे काय हे बोलताना भीती वाटत असल्याचा टोला राणे यांनी लगावला.

लोकांच्या जीवावर आपले आयुष्य जगतात ते आमच्या नेत्यांना खंडणीखोर म्हणतात हा मोठा जोक आहे. जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी म्हणजे उद्धव ठाकरे, असल्याची टीका राणे म्हणाले.

आम्ही संजय राऊत यांच्यावर खिचडी चोरीचे आरोप केले होते. त्यावर उरलेला बुरखा संजय निरुपम यांनी फडलेला असल्याचे राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -