Friday, September 19, 2025

Health: आले-तुळसने बनलेले हे ड्रिंक करणार वेटलॉस, काही महिन्यात पोट होईल कमी

Health: आले-तुळसने बनलेले हे ड्रिंक करणार वेटलॉस, काही महिन्यात पोट होईल कमी

मुंबई: खराब लाईफस्टाईलमुळे हल्ली लठ्ठपणाची(obesity) समस्या सामान्य बनत चालली आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. आम्ही तुम्हाला तुळस, मध आणि आल्यापासून बनणाऱ्या अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे वेटलॉस होण्यास मदत होईल.

तुळशीमध्ये युजेनॉल नावाचे आवश्यक तेल असते जे पचनसंस्थेसाठी अतिशय फायदेशीर असते. यासोबतच हाडांचे दुखणेही कमी होते.

तर आल्यामध्ये जिंजरोल नावाचे तत्व असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच शरीरातून एक्स्ट्रा फॅट बाहेर निघण्यास मदत होते.

आले आणि तुळस यांनी बनलेले हे स्पेशल ड्रिंक बनवण्यासाठी पाच ते सहा ताजी तुळशीची पाने आणि आल्याचा एक तुकडा घ्या.

एका भांड्यात पाणी घ्या. त्यात तुळस आणि आले टाका आणि पाणी अर्धे होत नाही तोपर्यंत उकळा.

उकळल्यानंतर पाणी गाळून घ्या आणि एका ग्लासात घ्या. स्वादासाठी तुम्ही यात मध मिसळू शकता. हळू हळू हे मिश्रण प्या.

हे मिश्रण सकाळी प्यायल्यास अधिक फायदेशीर आहे. दररोज याचे सेवन केल्यास महिन्याभरात याचे परिणाम दिसण्यास सुरूवात होईल.

Comments
Add Comment