नवी दिल्ली: टेस्लाचे प्रमुख एलन मस्क(elon musk) एप्रिल महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. असे मानले जात आहे की भारत दौऱ्यावर येथे नव्या गुंतवणुकीच्या योजनांचा खुलासा होणार आहे सोबतच टेस्लाच्या नव्या प्लांटबाबतही घोषणा होऊ शकते.
एलन मस्क घेणार पंतप्रधान मोदींची भेट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क एप्रिल महिन्यातील २२ एप्रिलच्या सुरूवातीच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान मोदींना भेटतील. या भेटीनंतर ते भारतातील गुंतवणुकीबद्दलच्या प्लानचा खुलासा करतील.
सरकारची नवी ईव्ही पॉलिसी
एलन मस्कने टेस्लाच्या भारतातील एंट्रीचे संकेत दिले आहेत. भारत सरकारच्या नव्या ईव्ही पॉलिसीच्या घोषणेनंतर भारतात टेस्लाची एंट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सरकारने नव्या ईव्ही पॉलिसीमध्ये देशातील उत्पादनावर गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सूट दिली आहे. नव्या ईव्ही पॉलिसीमध्ये ५० कोटी डॉलर हून अधिक गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना ५ वर्षासाठी १५ टक्के कस्टम ड्युटीचा फायदा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा फायदा उचलण्यासाठी त्यांना ३ वर्षाच्या आत भारतात आपला प्लांट लावावा लागेल.