Tuesday, April 29, 2025

महामुंबईरणसंग्राम २०२४महत्वाची बातमी

Congress Candidate: राज्यात लोकसभेसाठी काँग्रेसकडून आणखी दोन उमेदवार रिंगणात

Congress Candidate: राज्यात लोकसभेसाठी काँग्रेसकडून आणखी दोन उमेदवार रिंगणात

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेसने(congress) दोन आणखी जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. धुळे मतदारसंघातून शोभा दिनेश आणि जालना मतदारसंघातून कल्याण काळे यांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्रासाठी काँग्रेसची ही चौथी यादी आहे. कल्याण काळे यांची लढत भाजपच्या राव साहेब दानवे यांच्याविरुद्ध होणार आहे. तर शोभा यांच्यासमोर भाजपच्या सुभाष भामरे यांचे आव्हान आहे. मुंबईचया जागांवर आतापर्यंत कांग्रेस उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

काँग्रेसने १७ पैकी १५ जागांवर उतरवले उमेदवार

महाराष्ट्रात जागा वाटपांतर्गत काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. याआधीच्या पहिल्या तीन यादीत काँग्रेसने आपल्या खात्यातील १५ जागांवर उमेदवार उतरवले होते. चौथ्या यादीत आणखी दोन नावांसह एकूण १५ उमेदवारांची घोषणा झाली आहे. काँग्रेस दोन आणखी जागांवर उमेदवार देणार आहे.

या जागांवर निवडणूक लढवणार काँग्रेस

जागा वाटपात काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि रामटेक या जागा मिळाल्या आहेत.

या जागांवर लढत आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष सर्वाधिक २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. उद्धव ठोकरे यांनी आपल्या खात्यातील सर्व जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, उस्मानाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणार, हातकणंगले, औरंगाबाद, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर पूर्व हे मतदारसंघ मिळाले आहेत.

Comments
Add Comment