Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीChandrashekhar Bawankule: मविआचे सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होते?

Chandrashekhar Bawankule: मविआचे सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होते?

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : मविआचे सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होते? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला १०० कोटींची वसुलीची सुरूवात कोणी केली होती?,’ असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेससोबत राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे.

महाविकास आघाडीने मंगळवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्यावर प्रत्युत्तर दिले आहे. त्याचसोबत त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली. ‘यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार.’, असे मत त्यांनी व्यक्त केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘महाभ्रष्टाचारी आघाडीने ज्यांच्या नेतृत्वात अडीच वर्षे राज्याला लुटले ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जी टीका करत आहेत. हा एक मोठा विनोद आहे,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

४ जूननंतर घरात बसून राहण्याचे काम करावे लागेल

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केले. तुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामाही उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं २०१४, २०१९ प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकवणार आहे. ४ जूननंतर उबाठांना घरात बसूनच राहावे लागणार’ असल्याचे बावनकुळे यांनी सांंगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -