Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीChandrayaan 4 Update: चांद्रयान-४ बाबत मोठी अपडेट!

Chandrayaan 4 Update: चांद्रयान-४ बाबत मोठी अपडेट!

इस्रोच्या प्रमुखांनी सांगितले की, “पुढील टप्पा..…”

चांद्रयान ३ (Chandrayaan 3) मोहिमेच्या यशानंतर अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने इतर अनेक मोहिमा राबवल्या आहेत. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी २०२४ पर्यंत मानवयान चंद्रावर पाठवण्याची मोहिमेबाबत मोठी अपडेट दिली आहे. चांद्रसंशोधनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी चांद्रयान ४ (Chandrayaan 4) चे महत्त्व अधोरेखित करताना एस. सोमनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०२४ पर्यंत चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे ठरवलेले उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी सातत्यापूर्ण शोध आवश्यक आहे. एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना एस सोमनाथ यांनी कार्यक्रमाचा पुढील टप्पा सध्या प्रगतीपथावर आहे, असे सांगितले.

“चांद्रयान मालिकेतील चांद्रयान ४ ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रगतीशील प्रयत्न सुरू आहेत. २०४० मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही संकल्पना सत्यात उतरवायची असेल तर आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे चंद्र संशोधन चालू झाले आहे”, असं सोमनाथ म्हणाले. “चांद्रयान ४ हे या दिशेने पहिले पाऊल आहे. चंद्रावर यानाचे पाऊल टाकणे आणि नमुना गोळा करून ते पुन्हा पृथ्वीवर परत आणण्याचे असं चक्र असणार आहे”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

सोमनाथ यांनी रॉकेट, उपग्रह (Satellite) उपक्रमांपासून ते तंत्रज्ञान विकास प्रयत्नांपर्यंतच्या प्रकल्पांच्या विविध पोर्टफोलिओची रुपरेषा मांडली. अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी इस्रोचा (ISRO) बहुआयामी दृष्टीकोन अधोरेखित करून त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या प्रकल्पांचीही माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -