Sunday, May 11, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Amruta Khanvilkar: "मी फक्त नावाने नाही तर धर्माने देखील मराठी आहे..."

Amruta Khanvilkar:

ट्रोल करणाऱ्यांना अमृताचे सडेतोड उत्तर


मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हीने तिच्या अभिनया आणि नृत्यामुळे लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मराठी सिनेसृष्टीसोबत हिंदी सिनेसृष्टीमध्ये देखील तिने आपला ठसा उमटवला आहे. अमृताचे चाहते तिच्या कामाचे कौतुक करतात मात्र अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशातच आता अमृतानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.



अमृताची पोस्ट


अमृतानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार. नवीन मनोकामना, नवी स्वप्ने, देवा चरणी ठेऊन ती पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना केली असणार. जर तुम्ही हे सगळं केलय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मी ही हेच केलं. कारण मी देखील फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे. संस्काराने मराठी आहे. मूळची कोंकणातील, पण जन्म मुंबईचा आहे, मी हि कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे, मावशी आहे, ताई आहे, मैत्रीण आहे, बायको आहे आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्या मुळे मी एक अभिनेत्री आहे"


"तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेगवेगळे मुलाखती (interviews) देत आहे. विविध प्लॅटफॉर्म्स वर, आता ह्या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे. पण ट्रॉलिंगच्या नावा खाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते. वेशभूषा असो, हसणं असो, बोलणं असो, एका स्त्रीच्या प्रतेय्क गोष्टी वर किती, किती बोलायचं ? आणि त्याला काही सीमा का नाहीये ? जे लोक स्वतःचं खरं नाव किंव्हा साधा डीपी (DP) सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात ? मज्जा वाटते तुम्हाला ? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे. सोशल मीडिया चा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये .... पण ह्या वर जे तुम्ही लिहिता ... बोलता .... ह्यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात.", असंही अमृतानं पोस्टमध्ये लिहिलं.


पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, "असो, मी साधारण (normally) ह्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करतेच . पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं कि गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकत आहे.


Comments
Add Comment