मुरूड(प्रतिनिधी संतोष रांजणकर) – अदानी पोर्टच्या आगरदांडा येथे होणाऱ्या रेल्वे भू-संपादन मोजणीला येथील स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत येथून जाणारा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गालगत पासून नेण्यात यावा तसेच सातबा-यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा.आदी.मागण्यासह विरोध दर्शवित आज मोजणी होऊ दिली नाही.
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (मुरुड-जंजिरा) विभागाने येथील शेतकऱ्यांना आज दि.१० एप्रिल रोजी आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीसाठी संयुक्त नोटीस बजावण्यात आली होती.त्यानुसार सकाळी ९.३० वा.प्रत्यक्ष जागेवर हजर राहण्याचे सांगण्यात आले होते.
त्याप्रमाणे आज आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीला संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सदरचा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गालगत पासून नेण्यात यावा तसेच सातबा-यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा.अशी मागणी करत मोजणी होऊ दिली नाही.
यावेळी मुरुडच्या भूमी अभिलेख चे निमतानदार एम.पी.पोकळे, सहकारी तसेच रुषिकांत डोंगरीकर,यूसुफ अर्जबेगी, संतोष पाटील, आशिष नरेंद्र हेदूलकर,अर्पेश चिंदरकर, शब्बीर काझी,नजीर खतीब,तहसिन बशीर फकी,इमुद्दीन कादिरी,अहीर,मुब्बशिर खतीब शेतकरी उपस्थित होते.