मुंबई: सध्याच्या वेळेस क्रिकेट चाहते इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या रोमांचक सामन्यांच्या आनंद घेत आहेत. मात्र यातच टी-२० वर्ल्डकप २०२४ बाबत मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. यात स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला स्थान मिळू शकते.
३० डिसेंबर २०२२च्या रात्री ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. यानंतर तो बरेच महिने क्रिकेटपासून दूर होता. मात्र त्याने आता आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे आणि त्याने जबरदस्त फॉर्मात पदार्पण केले आहे.
पंतसह अनेक खेळाडूंवर नजर
यातच मीडिया रिपोर्टनुसार टी-२० वर्ल्डकपसाठी ऋषभ पंतला संघात निवडले जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक खेळाडूंवर बीसीसीआयच्या सिलेक्टर्सची नजर आहे.
पंत आयपीएलमध्ये विकेटकीपिंगमध्येही कमाल करत आहे. तो आपल्या लयीमध्ये परतताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंतने आतापर्यंत दोन अर्धशतके लगावली आहेत.
या महिन्याच्या अखेरीस होणार बैठक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत आपल्या फॉर्मात आणि पुढे तो किती फिट राहतो हे पाहता येईल. दरम्यान, सध्या तो फिट दिसत आहे. टी-२० वर्ल्डकप लक्षात घेता अनेक खेळाडूंवर सिलेक्टर्सची नजर आहे. यात पंतचा समावेश आहे. यावर्षी टी-२० वर्ल्डकप जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे.