Tuesday, July 1, 2025

Sleep: पोटावर की पाठीवर झोपले पाहिजे, जाणून घ्या योग्य पद्धत

Sleep: पोटावर की पाठीवर झोपले पाहिजे, जाणून घ्या योग्य पद्धत

मुंबई: प्रत्येकाला संपूर्ण दिवसाचा थकवा घालवण्यासाठी चांगली झोप मिळणे आवश्यक असते. साधारणपणे लोक झोपले की एकतर कुशीवर झोपतात नाहीतर पाठीवर झोपतात. मात्र याबाबत तुमच्या मनात एक प्रश्न नेहमीच असेल की अखेर झोपण्याची योग्य पद्धत कोणती असते.


साधारणपणे सोशल मीडियावर या प्रश्नाची अनेक उत्तरे मिळतात. काही वेबसाईट दावा करतात की पाठीवर झोपले पाहिजे की पोटावर. इतकंच नव्हे तर बाजारात अशीही उपकरणे मिळतात जे पाठीवर झोपण्यास मदत करण्याचा दावा करतात.



विविध लोकांसाठी विविध पद्धतीने झोपणे फायदेशीर


जेव्हा तुम्ही झोपी जाता तेव्हा शरीर स्वत: ठरवते की तुम्हाला कोणत्या अवस्थेमध्ये झोपले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्तीला शरीराच्या उजव्या भागावर त्रास होत असतो तेव्हा ती व्यक्ती झोपेत डाव्या कुशीवर झोपते.



चांगल्या झोपेसाठी काय केले पाहिजे


जेव्हा झोप येत असेल तेव्हा झोपण्यास जा.


झोपण्याची वेळ ठरवा.


झोपण्याच्या ४० मिनिटांआधी सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद केली पाहिजेत.


संध्याकाळी ६ वाजल्यानंतर चहा अथवा कॉफी पिऊ नये.

Comments
Add Comment