Saturday, July 13, 2024
Homeक्राईमCrime News: धक्कादायक! चेंबूरमधून अपहरण झालेली मुलगी तब्बल ८ महिन्यानंतर सापडली बिहारमध्ये

Crime News: धक्कादायक! चेंबूरमधून अपहरण झालेली मुलगी तब्बल ८ महिन्यानंतर सापडली बिहारमध्ये

आरोपीलाही करण्यात आली अटक

मुंबई : एका ३० वर्षांच्या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात घडली होती. चेंबूरच्या वाशीनाका परिसरात पीडित मुलगी वास्तव्यास असून ती ऑगस्ट २०२३ मध्ये परिसरातून अचानक गायब झाली होती. बराच वेळानंतरही ती घरी न परतल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनेक दिवस या मुलीचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यादरम्यान तिचे वडील काम करीत असलेल्या कारखान्यातील तरुण नरेश राय (३०) हादेखील त्याच दिवसांपासून कामावर आला नव्हता.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बिहारमध्ये असल्याचे समजले. आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ बिहारमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र तो वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत असल्यामुळे सापडण्यात यश मिळत नव्हते. अखेर पोलिसांनी वेषांतर करून दोन दिवस बिहारमधील माधवपुरा परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. मुलीला याच परिसरातील एका घरात ठेवल्याचे आरोपीने सांगितले. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी बिहार येथून या मुलीची सुटका करून आरोपीला अटक केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -