Sunday, October 26, 2025
Happy Diwali

MPSC Result : नाशिकचे भूषण लांडगे तर महिलांमध्ये सांगलीच्या गितांजली कोळेकर राज्यात प्रथम

MPSC Result : नाशिकचे भूषण लांडगे तर महिलांमध्ये सांगलीच्या गितांजली कोळेकर राज्यात प्रथम

दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट – ब सेवा मुख्य परीक्षा – २०२३ या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण ४९ पदांचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मुळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील भूषण निवृत्ती लांडगे हे अराखीव व मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला अराखीव गटातून सांगली जिल्ह्यातील गितांजली रविंद्रनाथ कोळेकर राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनेतील सूचना पाहाव्यात असे आयोगाने कळविले आहे.

Comments
Add Comment