वेब सीरिज सोडण्यामागचं सांगितलं कारण
मुंबई : आजवर सगळ्यात जास्त गाजलेली वेबसिरीज म्हणजे मिर्झापूर (Mirzapur). क्राईम-थ्रिलर या विषयावर बेतलेल्या या वेबसिरीजचे दोन्ही सीजन खूप गाजले. कालीन भैय्याचं गुन्हेगारी जग आणि त्यात सुरु असलेली सत्तेची चढाओढ यावर ही वेबसिरीज आधारलेली होती. मिर्झापूरच्या पहिल्या दोन सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता लवकरच तिसरा सीजन येणार असल्याची चर्चा आहे. या चांगल्या बातमीसह मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमीदेखील मिळत आहे.
राजकीय क्राईम थ्रिलर असलेल्या मिर्झापूर या सिरीज मध्ये दिव्येंदुने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मात्र मिर्झापूर ३ वेबसिरीजमध्ये मुन्नाभैयाची भूमिका साकारणारा अभिनेता दिव्येंदु यापुढे ही भूमिका साकारणार नसल्याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला. या भूमिकेने त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम केलाय. त्याचे काही वाईट अनुभवही त्याला आले आहेत. त्या भूमिकेचा खूप वाईट परिणाम त्याच्यावर झाला आहे. “कधी कधी तुम्ही त्या भूमिकेतच शिरलेले राहता आणि ते खूप वाईट असतं.” असं तो या मुलाखतीत म्हणाला आणि म्हणूनच, त्याने या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने मुन्ना भैय्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.
कधी रिलीज होणार तिसरा सीझन?
२०१८ मध्ये या वेबसिरीजचा पहिला सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि २०२० मध्ये आलेल्या दुसऱ्या सीजननेही प्रेक्षकांची मनं जिंकली. २०२२ मध्ये वेबसीरिजच्या निर्मात्यांनी सीजन ३चं शूटिंग सुरु झाल्याची घोषणा केली होती आणि या वेब सीरिजचं काम शेवटच्या टप्प्यात आल्याचं म्हंटलं जातंय. तिसऱ्या सीजनमध्ये अली फझल, पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी शर्मा हे कलाकार दिसणार आहेत. निर्मात्यांनी या वेब सीरिजचे पोस्टर रिलीज केले आहे. मात्र, अद्याप रिलीज डेट समोर आली नाही.