चेपॉक स्टेडियममध्ये जडेजाने घेतली चाहत्यांची फिरकी...

चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या चेन्नई आणि कोलकता सामन्यात रवींद्र जडेजाने चाहत्यांची चांगलीच फिरकी घेतली. संघाला विजयासाठी ३ धावांची गरज असताना शिवम दुबे क्लीन बोल्ड झाला. त्यामुळे त्याच्यानंतर जडेजा फलंदाजीला येणार हे निश्चित होते. कारण महेंद्रसिंह धोनी ७किंवा ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. चेन्नईच्या चाहत्यांना या मोसमात धोनी कधी एकदा मैदानावर फलंदाजी करताना पाहण्याची संधी मिळते याती आस लागली होती. धोनीनेही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत चाहत्यांची ही इच्छा पू्र्ण केली. पण त्याआधी जडेजाने चाहत्यांची मजा घेतली ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.



महेंद्रसिंह धोनी फलंदाजीला येणार या अपेक्षेने चाहते खूप उत्सुक होते. सर्वांच्या नजरा या चेन्नईच्या डगआऊटवर खिळल्या होत्या. तेवढ्यात रवींद्र जडेजा बॅटिंग किट घालून ड्रेसिंग रूममधून बाहेर आला. जणू काही तो फक्त फलंदाजीसाठीच जात होता. त्याला पाहताच प्रेक्षकांचा आवाज थोडा कमी झाला, पण नंतर थोडे पुढे गेल्यावर जडेजा वळला आणि ड्रेसिंग रूममध्ये परतला. हे पाहून चेन्नईच्या डगआऊटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफलाही हसू आवरता आले नाही.

Comments
Add Comment

PM Modi : ‘नरेंद्र’ नावाचीच भीती वाटतेय.... पाकिस्तानी बॉक्सरचा किस्सा ऐकून मोदींनाही फुटलं हसू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांचे

IND vs SL Mohammad Siraj : शेवटच्या षटकात ‘६, ६, ६’! सिराजने ३ चेंडूत पलटला सामना; श्रीलंकेच्या खेळाडूंनी चक्क बॅटच तपासली!

कोलंबो : भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अपेक्षेपेक्षा अधिक रोमांचक ठरला.

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि

Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

Nashik : जपानमधील क्युटो शहरात सुरु असलेल्या सहाव्या आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत

Women's Cricket : भारतावरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिकेकडून ३ टी-२० सामन्यांची भर

जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी