मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या(indian premier league) हंगामात अखेर कोलकाता नाईट रायडर्सला(kolkata knight riders) पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले. त्यांना हा पराभ(व चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध स्वीकारावा लागला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नईच्या संघाने सामन्यात केकेआरला ७ विकेटनी हरवले.
सामन्यात विजयासाठी चेन्नईच्या संघाला १३८ धावांचे आव्हान मिळाले होते. चेन्नईच्या संघाने १७.४ षटकांत हे आव्हान ३ विकेट गमावत पूर्ण केले. संघासाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५८ बॉलमध्ये नाबाद ६७ धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने २८,डेरेल मिचेलने २५ आणि रचिन रवींद्रने १५ धावा केल्या. केकेआरसाठी वैभव अरोराने २ आणि सुनील नरेनने १ विकेट घेतली.
कोलकाताचा हंगामातील पहिला पराभव
चेन्नई संघाने हा सामना जिंकत विजयपथावर परतला. चेन्नईने आतापर्यंत या हंगामातील ५ सामन्यांपैकी ३ सामने जिंकलेत. तर २मध्ये त्यांना पराभव पाहावा लागला. दुसरीकडे श्रेयच्या नेतृत्वात कोलकाता संघाने या हंगामात पहिल्यांदा पराभव स्वीकारला. त्यांनी सुरूवातीचे तीनही सामने जिंकले आहेत.
या सामन्यासाठी गायकवाडने प्लेईंग ११मध्ये अनेक बदल केले होते. वेगवान गोलदाज मथीशा पथिरानाचे पुनरागमन झाले नाही तो दुखापतग्रस्त आहे. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि समीर रिज्वी यांची संघात एंट्री झाली.