Saturday, August 16, 2025

अरूणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि नेहमी राहणार, पंतप्रधान मोदीचे चीनला उत्तर

अरूणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि नेहमी राहणार, पंतप्रधान मोदीचे चीनला उत्तर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी चीनला चोख उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींनी अरूणाचल प्रदेशवर चीन करत असलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच पुन्हा एकदा स्पष्ट करताना म्हटले की अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील.

तसेच केंद्र सरकारने वेळीच केलेला हस्तक्षेप आणि मणिपूर सरकारच्या प्रयत्नांमुळे या राज्यातील स्थितीमध्ये उल्लेखनीय सुधारणा होत आहे.

एका मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, पंतप्रधान मोदींचे हे विधान अरूणाचल प्रदेशवर दावा ठोकणाऱ्या चीनच्या प्रयत्नांनंतर आले आहे. यात बीजिंगने या भारतीय राज्यांमधील विविध स्थानांच्या ३० नव्या नावांची यादी जाहीर केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयानेही दिले सडेतोड उत्तर

याआधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अरूणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना फेटाळून लावले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की घराचे नाव बदलल्याने ते घर काही आपले होत नाही.

२८ मार्चलाही दिले होते उत्तर

भारताने २८ मार्चलाही म्हटले होती की चीनने कितीही दावे ठोकले तरी यामुळे भारताची भूमिका बदलणार नाही. अरूणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. ही भारताची भूमिका कायम राहील.

Comments
Add Comment