सिनेमा हिट होण्यासाठी लीड हिरोची गरज नाही, १०० कोटी कमावल्यानंतर म्हणाली ही अभिनेत्री

मुंबई: अभिनेत्री कृती सॅनॉनच्या(kriti sanon) क्रू या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर चांगली कामगिरीही केली. राष्ट्रीय पुरस्कार विजेती कृतीने म्हटले की सिने निर्मात्यांना बरेचदा असे वाटते की प्रेक्षकांना महिलाकेंद्रित सिनेमांमध्ये आवड नाहीत. 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' या सिनेमानंतर कृती 'क्रू' सिनेमात दिसली. क्रू सिनेमात तिने तब्बू आणि करीना कपूर खान यांच्यासोबत तिसऱी मुख्य अभिनेत्रीची भूमिका निभावली.



९ दिवसांतच कमावले १०० कोटी रूपये


सिनेमाच्या प्रदर्शनानंतर ९ दिवसांच्या आतच जगभरात या सिनेमाने १०० कोटींहून अधिक कमाई केली. राजेश ए कृष्णन यांनी दिग्दर्शित केलेल्या क्रू या सिनेमात तीन एअरहोस्टेसची कहाणी दाखवण्यात आली आहे. जेव्हा यांची एअरलाईन कंपनीला दिवाळखोरीचा फटका बसतो तेव्हा या कशी आपली जबाबदारी सांभाळतात हे दाखवण्यात आले आहे. कृती म्हणाली, प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यासाठी कोणत्याही सिनेमात लीड हिरो हवाच असे नाही. दीर्घकाळापासून लोकांनी पुरुष केंद्रित सिनेमांप्रमाण महिला केंद्रित सिनेमा बनवण्याची जोखीम उचललेली नाही.


त्यांना वाटते की प्रेक्षक थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी येणार नाही आणि त्यांची कमाईही होणार नाही. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमानंतर मला वाटते की ही एक प्रकारच्या बदलाची सुरूवात आहे. आशा आहे की हळू-हळू लोक येतील आणि महिला केंद्रित सिनेमांमध्येही तितकेच पैसे गुंतवतील. तसेच असे सिनेमे काढण्याची जोखीम देखील घेतील. जितके ते पुरुषप्रधान सिनेमांसाठी करतात तितकेच महिला प्रधान सिनेमांसाठीही करतील.

Comments
Add Comment

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित

हेमंत ढोमे यांच्या शाळेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा

रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील

हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात

‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला!

मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाची तालीम थेट हैदराबादला