Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीसिनेमा हिट होण्यासाठी लीड हिरोची गरज नाही, १०० कोटी कमावल्यानंतर म्हणाली ही...

सिनेमा हिट होण्यासाठी लीड हिरोची गरज नाही, १०० कोटी कमावल्यानंतर म्हणाली ही अभिनेत्री

मुंबई: अभिनेत्री कृती सॅनॉनच्या(kriti sanon) क्रू या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर चांगली कामगिरीही केली. राष्ट्रीय पुरस्कार विजेती कृतीने म्हटले की सिने निर्मात्यांना बरेचदा असे वाटते की प्रेक्षकांना महिलाकेंद्रित सिनेमांमध्ये आवड नाहीत. ‘तेरी बातो मे ऐसा उलझा जिया’ या सिनेमानंतर कृती ‘क्रू’ सिनेमात दिसली. क्रू सिनेमात तिने तब्बू आणि करीना कपूर खान यांच्यासोबत तिसऱी मुख्य अभिनेत्रीची भूमिका निभावली.

९ दिवसांतच कमावले १०० कोटी रूपये

सिनेमाच्या प्रदर्शनानंतर ९ दिवसांच्या आतच जगभरात या सिनेमाने १०० कोटींहून अधिक कमाई केली. राजेश ए कृष्णन यांनी दिग्दर्शित केलेल्या क्रू या सिनेमात तीन एअरहोस्टेसची कहाणी दाखवण्यात आली आहे. जेव्हा यांची एअरलाईन कंपनीला दिवाळखोरीचा फटका बसतो तेव्हा या कशी आपली जबाबदारी सांभाळतात हे दाखवण्यात आले आहे. कृती म्हणाली, प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यासाठी कोणत्याही सिनेमात लीड हिरो हवाच असे नाही. दीर्घकाळापासून लोकांनी पुरुष केंद्रित सिनेमांप्रमाण महिला केंद्रित सिनेमा बनवण्याची जोखीम उचललेली नाही.

त्यांना वाटते की प्रेक्षक थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी येणार नाही आणि त्यांची कमाईही होणार नाही. प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमानंतर मला वाटते की ही एक प्रकारच्या बदलाची सुरूवात आहे. आशा आहे की हळू-हळू लोक येतील आणि महिला केंद्रित सिनेमांमध्येही तितकेच पैसे गुंतवतील. तसेच असे सिनेमे काढण्याची जोखीम देखील घेतील. जितके ते पुरुषप्रधान सिनेमांसाठी करतात तितकेच महिला प्रधान सिनेमांसाठीही करतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -