मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघांत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात २९९ उमेदवारांचे अर्ज पात्र असून, त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने २०४ उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर या ५ लोकसभा मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल, तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ८ मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील या ८ लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय एकूण ८ जनरल निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक एकूण ५ आणि खर्च निरीक्षक एकूण ११ याप्रमाणे नियुक्त करण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाने ४० टक्के दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व ८५ वयावरील ज्येष्ठ नागरिकांमधील इच्छुक मतदारांना १२ – डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील ८ लोकसभा मतदारसंघांत ६ एप्रिलपर्यंत ८५ वर्षे वयावरील १० हजार ६७२ ज्येष्ठ नागरिकांचे, तर ४० टक्के दिव्यांगत्व असलेले ३ हजार ५५५ दिव्यांग मतदारांचे त्याचप्रमाणे अत्यावशक सेवा या श्रेणीत ३८५ असे एकूण १४ हजार ६१२ अर्ज गृह मतदानासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.
राज्यामध्ये केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इ. बाबीची जप्ती करण्यात आली. यामध्ये ३८ कोटीची रोख रक्कम, २४.२६ कोटीची ३० लाख २ हजार ७८१ लिटर दारू, २०७.४५ कोटीचे १० लाख ५३ हजार ५४५ ग्रॅम ड्रग्ज, ५५.१० कोटीचे २ लाख ७५ हजार ८३१ ग्रॅम मौल्यवान धातू, ४२ लाखांचे ४ हजार २७२ फ्रिबीज, ७२.८५ कोटीचे इतर साहित्य असे एकूण ३९८.२० कोटीची जप्ती करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेली शस्त्रे १९५, परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली शस्त्रे ७२१, परवाना जमा करण्यापासून सूट देण्यात आलेली शस्त्रे १४,७९२, तर राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी कायद्यांतर्गत ५२ हजार ६५७ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
उमेदवाराने त्याचे नाव व चिन्ह मतपत्रिकेत कोणत्या जागी येईल ही माहिती असलेल्या डमी मतपत्रिका छापून घेतल्यास, त्याला हरकत असणार नाही. मात्र, अशा डमी मतपत्रिकेवर अन्य उमेदवारांची नावे किंवा चिन्हे असता कामा नयेत. अशी डमी मतपत्रिका, खऱ्या मतपत्रिकेचा रंग तसेच आकार याच्याशी मिळती-जुळती असता कामा नये. तसेच, मतदारांच्या माहितीकरिता उमेदवार किंवा राजकीय पक्ष डमी बॅलेट युनिट तयार करू शकतात, असे डमी बॅलेट युनिट लाकूड, प्लास्टिक किंवा प्लाय बोर्ड बॉक्सचे असू शकतात. याबाबत सविस्तर तरतुदी उमेदवारांच्या हस्तपुस्तिकेत नमूद करण्यात आलेल्या आहेत, असेही चोक्कलिंगम यांनी यावेळी सांगितले.
तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील २ आणि पुणे विभागातील ७ व औेरंगाबाद विभागातील २ अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक ७ मे २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
यामध्ये १२ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून १९ एपिल रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. नामनिर्देशन पत्र छाननी दि. २० एप्रिल रोजी होईल तर २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…