Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीPushpa 2 teaser out : डोळ्यांत आग, पायांत घुंगरु, गळ्यात लिंबाची माळ,...

Pushpa 2 teaser out : डोळ्यांत आग, पायांत घुंगरु, गळ्यात लिंबाची माळ, अर्धनारीच्या रुपात पुष्पाचा रुद्रावतार!

अल्लु अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २ : द रुल’चा खतरनाक टीझर आऊट

मुंबई : अभिनेता अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘पुष्पा’ (Pushpa) सिनेमाने गेल्यावर्षी धुमाकूळ घातला. त्यातली गाणी, पुष्पाच्या अॅक्शन्स, रश्मिकाच्या डान्स स्टेप्स सर्व काही सुपरहिट ठरलं. यानंतर आता प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत ते ‘पुष्पा २ : द रुल’च्या (Pushpa 2 : The Rule) रिलीजची. प्रदर्शनासाठी अजून ४ महिने बाकी असतानाही प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड शिगेला पोहोचली आहे. ५ एप्रिलला रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त श्रीवल्लीचा पुष्पा-२ मधील पहिला लूक रिलीज करण्यात आला. यानंतर आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या सिनेमाचा टीझर आऊट करण्यात आला आहे. ज्याला अवघ्या एका तासातच २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हे व्ह्यूज वेगाने वाढत आहेत.

पुष्पामधील अल्लुचा हटके अंदाज सर्वांच्याच पसंतीस उतरला. त्याचा एक पाय सरकवत चालण्याची स्टाईल, हनुवटीजवळून हात फिरवणं याची तर तरुणाईमध्ये अजूनही प्रचंड क्रेझ आहे. यानंतर आता ‘पुष्पा २ : द रुल’ मध्येही अल्लु एका वेगळ्याच रुपात दिसणार आहे. त्याचा टीझरमधील तो रुद्रावतार पाहून अनेकांनी अंगावर शहारे आल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

अल्लु अर्जुन या टीझरमध्ये चक्क विविध भरजरी दागिने, साडी नेसून, गळ्यात लिंबाची माळ, हारतुरे, कानात मोठे झुमके घालून अवतरला आहे. चेहऱ्यावर रंगरंगोटी करून हातात अंगठ्या, दागिने आणि एका हातात बंदुक पकडलेल्या पुष्पाचा लूक पाहून चाहत्यांनी या टीझरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या संपूर्ण १ मिनिट ८ सेकंदाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना एकही संवाद ऐकायला मिळत नाही. सगळं लक्ष अल्लू अर्जुनवर केंद्रीत करण्यात आलं आहे. ‘पुष्पा २’ मध्ये प्रेक्षकांना भरभरून अ‍ॅक्शन पाहायला मिळेल हे टीझरमुळे स्पष्ट झालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

दरम्यान, अल्लू अर्जुन ८ एप्रिल रोजी आपला ४२ वा वाढदिवस (Allu Arjun Birthday) साजरा करत आहे. याच खास प्रसंगी पुष्पा २ चा टीझर चाहत्यांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे. सर्वांनी माझ्या वाढदिवशी भरभरुन दिलेल्या प्रेमामुळे हा टीझर म्हणजे माझ्याकडून एक रिटर्न गिफ्ट आहे, अशा भावना अल्लु अर्जुन सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. बहुचर्चित ‘पुष्पा २’ यावर्षी १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -