चंद्रपूर: देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची(loksabha election 2024) रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाच्या देशभरात जोरदार सभा होत आहे. भाजपही जोरदार प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींही(Pm narendra modi) विविध ठिकाणी सभा घेत आहे. चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. यावेळी सभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर मराठीतून जोरदार टीका केली.
यावेळी काँग्रेसवर टीका करताना मोदींनी त्यांची तुलना कडू कारल्याशी केली आणि मराठीतीही म्हणही ऐकवली. पंतप्रधान मोदी म्हणाले, कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच राहणार. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस कधीच बदलणार नाही. त्यांनीच केलेल्या कामांमुळे काँग्रेसला देशातील लोकांचे समर्थन मिळत नाही आहे.
#WATCH | Chandrapur, Maharashtra: PM Narendra Modi compares Congress to bitter gourd; says, “Bitter gourd can never be sweet even if mixed with ghee or sugar. It also implies to Congress. Due to its misdeeds, today the Congress party has lost public support within the country,… pic.twitter.com/DiiWy4YPFu
— ANI (@ANI) April 8, 2024
काँग्रेसच्या घोषणापत्रावरही पंतप्रधान मोदींनी यावेळी टीका केली. त्यांनी आपल्या घोषणापत्रात मुस्लिम लीगच्या भाषेचा वापर केला आहे. तुम्हाला हे स्वीकारार्य आहे का? देशाला हे मंजूर आहे का?असा सवाल त्यांनी यावेळी जनतेला केला. यांचे खासदार भारताच्या आणखी एका विभाजनाची गोष्ट करत आहे. दक्षिण भारताला वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी त्यांनी इंडिया अलायन्सवर जोरदार टीका केली.
यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरही टीका केली. त्यांनी नकली शिवसेना असे आपल्या भाषणादरम्यान म्हटले. काँग्रेसच्या विभाजनकारी विचारधारेवरही त्यांनी कडाकडून टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळकांचाही यावेळी उल्लेख केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीर मुद्द्यावर काँग्रेसला केलेल्या विरोधाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.