Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

गोविंदानंतर संजय दत्त लोकसभा निवडणुकीने राजकारणात करणार कमबॅक?

गोविंदानंतर संजय दत्त लोकसभा निवडणुकीने राजकारणात करणार कमबॅक?

मुंबई: सिने इंडस्ट्रीमधील दोन मोठी नावे कंगना राणावत(Kangana ranaut) आणि गोविंदा(govinda) या निवडणुकीतून राजकीय मैदानात उतरले आहे. कंगना राजकारणात पहिल्यांदाच उतरत आहे तर गोविंदा दुसऱ्यांदा राजकारणात उतरत आहेत. या दोघांच्या राजकारणात उतरण्याच्या बातम्यानंतर आता सिने इंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेता राजकारणात कमबॅक करत असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. हा अभिनेता आहे संजय दत्त.


संजय दत्तबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे की यावेळेस निवडणुकीच्या मैदानात तो उतरू शकतो. आता संजयने स्वत: याचे उत्तर दिले आहे. त्याने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत राजकारणात उतरण्याच्या चर्चांवर उत्तर दिले आहे.


 


राजकारणात येणार संजय दत्त?


संजय दत्तने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, मी आपल्या राजकारणात येणाच्या चर्चांना विराम लावू इच्छितो. मी कोणत्याही पक्षात जात नाहीये अथवा निवडणूक लढवत नाहीये. जर मला असे काही करायचे असेल तर ते लपवणार नाही, जर मला राजकारणाच्या मैदानात उतरायचे असेल तर सगळ्यात आधी मी हे स्वत: जाहीर करेन. माझ्याबद्दल सध्या ज्या काही चर्चा सुरू आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नका.


काही दिवसांपूर्वी गोविंदाने राजकारणात एंट्री घेतली. गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी काहीच दिवसापूर्वी प्रवेश घेतला.

Comments
Add Comment