Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीSurya Grahan 2024: सोमवारी किती वाजता लागणार सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतात दिसणार...

Surya Grahan 2024: सोमवारी किती वाजता लागणार सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतात दिसणार का हे ग्रहण

मुंबई: २०२४ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सोमवारी ८ एप्रिलच्या रात्री लागणार आहे. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र येतो तेव्हा या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण वैज्ञानिक आणि धार्मिक दोनही कारणांमुळे महत्त्वाची आहे. ८ एप्रिलला लागणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत मनात अनेक प्रश्न आहेत. जसे हे सूर्यग्रहण कुठे-कुठे दिसणार आहे. किती वाजता हे सूर्यग्रहण लागेल. भारतात याचा सूतक काळ मान्य असणार का?

किती वाजता लागणार सूर्यग्रहण?

भारतीय वेळेनुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिलला रात्री ९ वाजून १२ मिनिटांपासून ते ९ एप्रिल रात्री २ वाजेपर्यंत असणार आहे. याचा कालावी ५ तास १० मिनिटांचा असेल.

भारतात दिसणार का सूर्यग्रहण?

८ एप्रिलला लागणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिटक, अटलांटिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका(अलास्का सोडून), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागांमध्ये, इंग्लंडच्या उत्तर पश्चिम क्षेत्र आणि आयर्लंडमध्ये दिसेल.

भारतात सूतक काळ असणार3का?

साधारणपणे सूर्यग्रहण लागण्याच्या १२ तास आधी सूतक काळ लागू होतो. या कालावधीत कोणतीही शुभ अथवा मंगल कार्ये केली जात नाहीत. दरम्यान, ८ एप्रिलचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या दरम्यान सूतककाळही मान्य असणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -