Wednesday, July 9, 2025

कोथेरी येथे घराला आग; लाखोंचे नुकसान

कोथेरी येथे घराला आग; लाखोंचे नुकसान

महाड( प्रतिनिधी) - महाड तालुक्यातील कोथेरी वडाचा कोंड येथे राहणाऱ्या दगडू शिंदे यांच्या घराला आज सकाळी १० वाजण्याचे सुमारास अचानक आग लागल्याने घरातील रोकड, सामानसुमान कपडे असे सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी तातडीने पाण्याचा मारा केल्याने महाड नगर परिषदेचा अग्नीशामक दल येण्यापुर्वी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.


महाड तालुक्यातील कोथेरी वडाचा कोंड येथे राहणारे दगडू शिंदे हे कामानिमित्त मुंबई येथे आहेत त्यांचा मुलगा व मुलगी महाड शहरात सकाळी आपल्या कामावर निघून गेले तर त्यांची आई ही रानात गेली होती. सकाळी १० वाजण्याचे सुमारास घरात कोणीही नसताना अचानक आग लागली. शिंदे यांचे घराला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येई पर्यत घरातील कपाटे, फर्निचर, भाताचे भरून ठेवलेले ड्रम यांनी पेट घेतला होता.


स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्नाने ही आग विझवण्यात यश मिळवले. मात्र घरातील कपाटात ठेवलेली दीड लाखाची रोकड आणि फर्निचर सामानसुमान कपडे असे एकुण अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >