विश्वनिर्मितीबद्दल वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी विश्वाच्या उत्पत्तीविषयी तीन सिद्धांत मांडले. त्यांपैकी प्रचलित असलेला सिद्धांत हा प्रसरणशील विश्व हा आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी एखाद्या वायूच्या अतिशय तप्त व प्रचंड महाकाय गोळ्यांचा महाभयंकर असा स्फोट होऊन विश्व निर्माण झाले.
यशश्री या अभ्यासू व जिज्ञासू मुलीला एक विज्ञानपरी भेटते. यशश्री ही बुद्धीने खूपच हुशार असते. ती परीला आपल्या आकाशासंबंधी विविध प्रश्न विचारीत असते. परीही तिच्या प्रश्नांची उत्तरे देत असते. परीताई आपण अवकाशात म्हणतो म्हणजे आकाशातच ना गं? त्यातच तर आकाशगंगा आहेत ना? यशश्रीने परीला प्रश्न केले. म्हणजे आपल्या या अवकाशात अनेक आकाशगंगा आहेत. हे तर तुला माहीतच आहे. हो बाबांनी कालच सांगितले मला. पण अवकाशात व आकाशात काय फरक आहे? यशश्रीने विचारले नाही. आकाशाचा त्याहीपेक्षा खूप मोठा अफाट विस्तार म्हणजेच अवकाश. आकाश आणि अवकाश या दोन संज्ञांमध्ये बराच फरक आहे. ती परी सांगू लागली, आपण दिवसा डोळ्यांनी जे बघतो ते आकाश असते. रात्री त्या आकाशापारचे विशाल असे अवकाश आपणास दिसते. रात्रीलाही अवकाश आपल्या डोळ्यांनी फारच कमी दिसते. दुर्बिणीतून मात्र बरेच विस्तीर्ण असे अवकाश बघता येते व आपणास खूप छान छान चांदण्या म्हणजे तारे दिसतात.
हे अवकाश म्हणजे काय असते परीताई? यशश्रीने विचारले. परी सांगू लागली, विश्वातील साऱ्या वस्तू ज्या अतिविशाल पोकळीत फिरतात त्या पोकळीला अवकाश म्हणतात. अवकाश ही एक आकाशापेक्षाही खूप मोठी अफाट अशी निर्वात पोकळी आहे. त्यात असंख्य आकाशगंगा आहेत. कित्येक तेजोमेघ, कृष्णमेघ व धुळीचेही मेघ आहेत. प्रत्येक आकाशगंगांमध्ये अगणित तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रहही आहेत. त्यांतच धुमकेतू व कृष्णविवरेही आहेत. अशा ह्या अवकाशाला आरंभही नाही व शेवटही नाही.
हे विश्व कसे निर्माण झाले परीताई? यशश्रीने विचारले. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी विश्वाच्या उत्पत्तीविषयी तीन सिद्धांत मांडले आहेत. त्यांपैकी जास्त प्रचलित व सर्वमान्य असलेला सिद्धांत हा प्रसरणशील विश्व हा आहे. शास्त्रज्ञांच्या मते पूर्वी अब्जावधी वर्षांपूर्वी एखाद्या वायूच्या अतिशय तप्त व प्रचंड महाकाय गोळ्यांचा महाभयंकर असा स्फोट झाला. त्यालाच शास्त्रज्ञ ‘महास्फोट सिद्धांत’ म्हणतात. या स्फोटामुळेच विश्व निर्माण झाले व ते स्फोटानंतर प्रसरण पावत मोठ्या होणाऱ्या वायूच्या ढगासारखे मोठे मोठे होऊ लागले. परीने खुलासा केला.
विश्व प्रसरण पावत आहे म्हणजे नक्की काय होत आहे? यशश्रीने शंका काढली. परी म्हणाली, विश्व प्रसरण पावत आहे याचा अर्थ ह्या विश्वातील असंख्य आकाशगंगा या एकमेकींपासून खूप वेगाने दूर जात आहेत. म्हणजे त्यातील पोकळी वाढत आहे.
मग विश्वाची सीमा कोणती आहे? यशश्रीने प्रश्न केला. विश्वाला सीमाच नाही. विश्व हे असीम, अमर्याद, अफाट व अनंत असे आहे. परी उत्तरली. मग अंतराळ व अवकाश यात काय फरक आहे? यशश्रीने फरक विचारला. ते एकच आहे. फक्त नावे दोन आहेत. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर असलेल्या संपूर्ण अफाट निर्वात मोकळ्या पोकळीस अंतराळ म्हणतात, तर कोणत्याही दोन ग्रहांमधील विशाल अशा निर्वात मोकळ्या पोकळीस अवकाश म्हणतात एवढाच काय तो फरक. परीने उत्तर दिले. अवकाशात पोकळी कशासाठी असेल? तिचा काही उपयोग होतो का? यशश्रीने प्रश्न केला. अवकाशातील पोकळीत अवकाशयाने, कृत्रिम उपग्रह सहजपणे संचार करू शकतात. पोकळी निर्वात असल्यामुळे तेथे कुठल्याही प्रकारचे घर्षण होत नसते. त्यामुळे अवकाशयानांची झीज होण्याचेही टळते. तसेच तेथे धूलिकण नसल्याने सर्व अवकाश हे एकदम स्वच्छ असते. त्यामुळे माणसाची नजर सहजगत्या दूरवर पोहोचते व अवकाशवीर दूरवरचेही निरीक्षण सहज करू शकतात. परीने सांगितले. वैश्विक किरण कसे असतात परीताई? यशश्रीने प्रश्न विचारला. अति उच्च उर्जा असलेल्या ऋणविद्युतभारित कणांचा प्रवाह म्हणजे विश्वकिरण. विश्वात जवळपास सूर्यप्रकाशाच्या वेगानेच जाणारे जे किरण असतात त्यांना वैश्विक किरण वा विश्व किरण किंवा अंतरिक्ष किरण अथवा अनंत किरण वा ब्रम्हांड किरणसुद्धा म्हणतात. ते अतिशय तरल व अतिवेगवान असतात. ते विश्वातून अत्यंत सूक्ष्म अशा कणांच्या स्वरूपात पृथ्वीवर येतात. ज्यावेळी त्यांचा निश्चित उगम माहीत नव्हता त्यावेळी त्यांना विश्वात निर्माण झालेले किरण म्हणून वैश्विक किरण हे नाव देण्यात आले होते; परंतु आधुनिक संशोधनानुसार शास्त्रज्ञांच्या मते नवतारे व अतिनवतारे, सूर्यासारखे काही सामान्य दर्जाचे तारे व आंतर तारकीय मेघ ही विश्वकिरणांची उगमस्थाने असावीत. परीने सविस्तर स्पष्टीकरण दिले. यशश्री, आजच्या दिवस एवढे पुरेसे झाले. आता काही माहिती मी तुला उद्या सांगेल. असे म्हणून परी निघून गेली. बरे असे काही नाही की ती फक्त बुद्धीनेच हुशार होती. तिच्या अंगी कलागुणांची खाण होती. त्यामुळे शिक्षकांची ती आवडती विद्यार्थिनी बनली.
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…