
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर बोचरी टीका
कल्याण : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याणच्या (Kalyan) जागेवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवारीची घोषणा केली. कल्याणच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं फडणवीस म्हणाले. यानंतर आज श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये हेरंबा मंदिर परिसरात प्रचाराचा फोडला. यावेळेस त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली.
श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभेला मोठमोठ्या वल्गना करून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लढणार असे सांगितलं जात होतं. ते कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला. कार्यकर्त्याला पुढे करून "तुम लढो हम कपडा सांभालते है" अशा प्रकारची भूमिका घेतल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या दोनवेळा नगरसेविका राहिलेल्या वैशाली दरेकर यांच्याशी लढत होणार आहे.