Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Coastal Road Accident : कोस्टल रोडवर घडला पहिला अपघात! कारचे स्टेअरिंग सैल झाले आणि...

Coastal Road Accident : कोस्टल रोडवर घडला पहिला अपघात! कारचे स्टेअरिंग सैल झाले आणि...

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर (Coastal Road) निर्मितीनंतर पहिला अपघात घडला आहे. कोस्टल रोड बोगद्यात काल दुपारी हा अपघात घडला. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्यात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. दरम्यान, अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, इमर्जन्सी कॉल बॉक्स (ECB) मधून एका व्यक्तीने कॉल केला की CP-5 जवळ बोगद्यामध्ये कार अपघात झाला आहे. लोकल ऑपरेशन मेंटेनन्स रूमने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील घटना तात्काळ तपासली आणि संबंधित विभागाला माहिती दिली. व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची टोयोटा कार धडकल्याचे पहायला मिळाले. यात धडकेमुळे कारच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मार्शलसह बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच टोइंग व्हॅनही बोलवण्यात आली. मार्शल्सने वाहतुकीवर नियंत्रित मिळवण्याचे काम केले.


कार चालकाच्या सांगण्यानुसार, कारचे स्टेअरिंग सैल झाल्याने हा अपघात घडला असल्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी कारमध्ये दोन जण होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे बोगद्याच्या आत ऑइल मोठ्या प्रमाणावर पडले होते. हे मार्शल टीमने साफ केले आहे.

Comments
Add Comment