Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीRaj Thackeray MNS : मनसेच्या पाडवा मेळाव्यात सर्व गुपिते बाहेर येणार!

Raj Thackeray MNS : मनसेच्या पाडवा मेळाव्यात सर्व गुपिते बाहेर येणार!

ट्रेलरमधून राज ठाकरेंची मनसैनिकांना साद

मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जाहीर होण्याआधीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मनसे (MNS) महायुतीत (Mahayuti) सामील होण्याच्या चर्चा आहेत. गेल्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकांना उपस्थिती लावल्यामुळे तसेच दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्यामुळे राज ठाकरे महायुतीला साथ देण्याच्या चर्चांना आणखी उधाण आले. पण राज ठाकरेंनी मात्र अद्यापही आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मनसैनिकही काहीसे संभ्रमात आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर आता मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे उत्तर देणार आहेत. तसं सांगणारा टीझर त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन रिलीज केला आहे.

राज ठाकरे यांनी ९ एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व मनसैनिकांना शिवतीर्थावर जमण्याचे आवाहन केले आहे. या मेळाव्यात राज ठाकरेंनी मनसैनिकांशी प्रत्यक्ष भेटून सर्व गोष्टींवर भाष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी रिलीज केलेल्या टीझरला कॅप्शन देण्यात आले आहे की, “९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे!” त्यामुळे राज ठाकरे या मेळाव्यात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मनसेसोबतच्या युतीचा महायुतीला फायदा काय?

भाजप आणि मनसे यांच्यात युतीच्या चर्चा सुरू आहेत. जर युती झाली तर मनसे एक जागा लढवणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. मुंबईवर प्रभुत्व असणाऱ्या शिवसेनेतच फूट पडल्यामुळे व त्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट भाजपासोबत असल्यामुळे ठाकरे गटाचा पराभव हे महायुतीचं एक प्रकारे लक्ष्य आहे. ज्यासाठी त्यांना मनसेची मदत होणार आहे. संपूर्ण मुंबईत शिवसेनेसोबतच मनसेचं वजनही मोठं आहे. मोठ्या प्रमाणातील मराठी व्होटबँक मनसेच्या बाजूनं आहे. गेल्या निवडणुकीतही मराठी व्होटबँक मनसेने मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ठाकरेंना चितपत करण्यासाठी भाजपने मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना आखली असल्याची चर्चा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -