Saturday, July 5, 2025

Pushpa 2 The Rule: कपाळी कुंकू, गळ्यात डोरलं, बोरमाळ, कातिल नजर!

Pushpa 2 The Rule: कपाळी कुंकू, गळ्यात डोरलं, बोरमाळ, कातिल नजर!

पुष्पा-२ मधील 'श्रीवल्ली' चा पहिला लूक समोर


मुंबई : 'पुष्पा-द राइज' हा २०२१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड केलं होतं. पुष्पा-द राइज बॉक्स ऑफिसवर भरगोस कमाई नंतर पुष्पाचा दुसरा भाग ‘पुष्पा-२’ (Pushpa 2 The Rule) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुन याने साकारलेल्या पुष्पा या व्यक्तिरेखेसोबत अभिनेत्री रश्मिकाने साकारलेली श्रीवल्ली या भूमिकेला प्रेक्षकांना भरघोस प्रेम दिले होते. चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून संपूर्ण जगाने ह्या गाण्यावर नाद केला होता. दरम्यान रश्मिका मंदानाच्या वाढदिवस निमित्ताने ‘पुष्पा -२’ निर्मात्यांनी श्रीवल्लीचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.


रश्मिकाने भरजरी साडी नेसून हातात बांगड्या व गळ्यात दागिने परिधान केले आहेत. कपाळी कुंकू, गळ्यात मंगळसुत्र आणि कातिल नजर असा पुष्पा-२ मधील श्रीवल्लीचा हटके लूक पाहून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.


दरम्यान, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांची या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Comments
Add Comment