Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : पंतप्रधान मोदींची ८ एप्रिलला चंद्रपुरात सभा

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींची ८ एप्रिलला चंद्रपुरात सभा

१६ एकर शेत, वाहनतळ… सभेसाठी भाजपा कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

चंद्रपूर : सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) धुरळा उडत आहे. प्रत्येकजण आपपल्या पक्षाच्या प्रचारासाठी कंबर कसून मेहनत घेत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता चंद्रपुरातील (Chandrapur) मोरवा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. मोरवा विमानतळालगत १६ एकर शेतात ही जाहीर सभा होणार आहे. सभेची जय्यत तयारी सुरू असून ती यशस्वी करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभेला गडचिरोली-चिमूर आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील उमेदवारही उपस्थित राहणार आहेत.

सभेसाठी किमान पाच ते सात हजार वाहने ग्रामीण भागातून येणार असल्याने वाहनतळाची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तथा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सभास्थळाची पाहणी केली. भाजप कार्यकर्तेदेखील सभास्थळ पाहून आले आहेत. या सभेतून पंतप्रधान मोदी चंद्रपुरातील जनतेला काय आवाहन करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -