Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

RBI कडून पहिलं पतधोरण जाहीर; रेपो रेटमध्ये काय झाला बदल?

RBI कडून पहिलं पतधोरण जाहीर; रेपो रेटमध्ये काय झाला बदल?

नवी दिल्ली : भारतात १ एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष (Financial year) सुरु झालं. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) यंदाच्या आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण (Credit policy) जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यंदा देखील रेपो रेटमध्ये (Repo rate) कोणताही बदल झालेला नाही. आरबीआयकडून (RBI) रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम आहे. व्याजदरात कोणतेही बदल होणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे.


फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ झाली होती. ३ ते ५ एप्रिल दरम्यान पतधोरण समितीची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय झाला आहे. तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर ७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत ७.१ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.९ टक्के, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत ७ टक्के विकासदर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Comments
Add Comment