Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीVanchit Bahujan Aghadi : वंचितला मोठा धक्का! यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज...

Vanchit Bahujan Aghadi : वंचितला मोठा धक्का! यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा अर्ज बाद

ऐनवेळी बदलला होता उमेदवार

यवतमाळ : अनेक समस्यांना सामोरं गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीसमोर (Vanchit Bahujan Aghadi) आणखी एक अडचण उभी ठाकली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा (Yavatmal Washim Lok Sabha) मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड (Abhijeet Rathod) यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत अर्ज रद्द करण्यात आला आहे. वंचितला निवडणुकांपूर्वीच हा मोठा धक्का बसला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आपलं नामनिर्देश पत्र सादर करण्याची काल दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर आज या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार होती. दरम्यान यवतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया करत असताना अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.

ऐनवेळी बदलला होता उमेदवार

वंचित बहुजन आघाडीने काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलला होता. सुभाष खेमसिंग पवार यांच्याऐवजी युवा उमेदवार असलेल्या अभिजित राठोड यांना संधी दिली होती. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघासाठी नामांकन दाखल करायच्या शेवटच्या दिवसाअखेरीस एकून ३८ उमेदवारांची ४९ नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केली गेली. तर आज या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ३८ उमेदवारांपैकी इतर किती उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातात हेही पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -