नवी मुंबई( प्रतिनिधी) – नवी मुंबई शहराच्या ऐरोली विभागात मागील ३५ वर्षांपासून अविरतपणे वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणार्या लायन्स क्लब ऑफ ऐरोली शाखेच्यावतीने ‘आरोग्य संजीवनी‘या उपक्रमा अंतर्गत आरोग्य विषयक सुविधांकरीत निधी संकलन करण्यासाठी महाराष्ट्राचा कणखर आवाज म्हणून ओळख असणारे गायक नंदेश उमप यांच्या मराठी आणि हिंदी गाण्याची संगीत मैफील आयोजित करण्यात आली आहे. येत्या शुक्रवार ५ मार्च रोजी रात्री ८ वाजता ही संगीत मैफिल नवी मुंबईकर रसिकांना अनुभवता येणार आहे.
लायन मनोज ब्रीड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, लायन्स क्लबच्या ऐरोली शाखेने सदर संगीत मैफिल वैद्यकीय केंद्र आणि इतर सामाजिक उपक्रमांच्या मदत निधी करीता आयोजित केली आहे. आज अनेक उपचाराकरीता महागडी वैद्यकीय साधणे असल्याने त्याचा लाभ गरजू रुग्णांना घेता येत नाही त्यांना लागणारा खर्चाचा भार कमी व्हावा यासाठी नवीन वैद्यकीय उपकरणे देण्यासाठी त्याच प्रमाणे ऐरोलीत प्रथमच अद्ययावत नेत्र तपासणी केंद्र लायन्स क्लबच्या माध्यमातून सुरु करण्याकरीता यातील निधीचा वापर केला जाणार आहे.
लायन्स क्लबने गणेश दर्शन स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, चित्रकला स्पर्धा आणि गरजू रुग्णांवर माफत दरात आरोग्य सुविधा दिल्या आहे. याला ज्या प्रमाणे नागरिकांनी प्रतिसाद दिला त्यापेक्षाही अधिक नागरिकांनी गरजवंतासाठी आपला खारीचा वाटा उचलत सहभागी होण्याचे आवाहन लायन मनोज ब्रीद यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लायन मनोज ब्रीद (९३२०२५०२७७), लायन प्रिती शेट्टी (९९६७५५२४९९), लायन संजय आवारे (९८२०००९९७९)यांच्याशी संपर्क साधावा.