Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीमानुषी छिल्लर श्रद्धा कपूर आणि क्रिती सॅननसोबत 'नो एंट्री' सिक्वेलमध्ये सामील होणार?

मानुषी छिल्लर श्रद्धा कपूर आणि क्रिती सॅननसोबत ‘नो एंट्री’ सिक्वेलमध्ये सामील होणार?

मुंबई : मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहे कारण एकामागे एक सुपरहिट चित्रपट करत ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे. ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि पीरियड-ड्रामा ‘सम्राट पृथ्वीराज’ यांसारख्या ॲक्शनर्सचा शोध घेतल्यानंतर मानुषी एका कॉमेडी चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.

सूत्रानुसार मानुषी छिल्लर (Manushi Chhillar), श्रध्दा कपूर (Shraddha Kapoor) आणि कृती सेनन (Kriti Sanon) सह २००५ मध्ये आलेल्या ‘नो एंट्री’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘नो एंट्री में एंट्री’ (No Entry sequel) च्या प्रतिष्ठित स्टार कास्टमध्ये सामील होणार आहेत. याचा चर्चा सध्या इंडस्ट्रीत जोरदार होताना दिसतात. सूत्रांनी सांगितले की मानुषी अर्जुन कपूर, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार असून ती मुख्य भूमिकेत या सिक्वलमध्ये सामील होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या या प्रोजेक्ट मध्ये मानुषी पहिल्यांदा क्रिती आणि श्रध्दा स्क्रीन शेयर करणार आहे.

तर ही अभिनेत्री पहिल्यांदाच अर्जुन, वरुण आणि दिलजीतसोबत जोडी करताना दिसणार आहे. आता चर्चा सुरू असताना यावर विश्वास ठेवावा की नाही हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. तर मानुषी, क्रिती आणि श्रद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

मानुषी छिल्लर वेगवेगळ्या शैलीतील स्क्रिप्ट्स निवडून एक उत्तम अभिनेत्री आहे हे तिने सिद्ध करून दाखवल आहे. ती सध्या अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असून या ॲक्शनरच्या रिलीजनंतर मानुषी छिल्लर जॉन अब्राहम स्टारर ‘तेहरान’मध्ये दिसणार आहे. दरम्यान क्रिती तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘क्रू’च्या यशाचा आनंद घेत आहे, तर श्रद्धा ‘स्त्री २’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -