मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४च्या १६व्या सामन्यात शानदार विजय मिळवला. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्लीने हा सामना तब्बल १०६ धावांनी गमावला. कोलकाता या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. तर दिल्लीचा संघ नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआर संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले असून तीनही सामने जिंकले आहेत. त्यांच्याकडे ६ पॉईंट्स आहेत. त्यांचा नेट रनरेट +2.518 इतका आहे. केकेआरने दिल्लीआधी सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवले होते.
राजस्थान रॉयल्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी ३ सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. राजस्थानचा नेट रनरेट केकेआरपेक्षा कमी आहे. याच कारणामुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थानचा नेट रनरेट +1.249 इतका आहे आणि त्यांच्याकडे ६ पॉईंट्स आहेत.
तिसऱ्या स्थानावर चेन्नई
चेन्नई सुपर किंग्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने ३ सामने खेळले आहेत. या दरम्यान २ सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला. चेन्नईचे ४ पॉईंट्स आहेत. लखनऊ सुपर जायंट्सबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्याकडे ४ पॉईंट्स आहेत. त्यांनी ३ सामने खेळले आहेत. तसेच २मध्ये विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्स ४ पॉईंट्ससह पाचव्या स्थानावर आहे. त्यांनीही ३ सामने खेळले आहेत. तसेच यातील २ जिंकले आहेत. त्यांचा रनरेट सीएसके आणि एलएसजीपेक्षा कमी आहे.
सगळ्यात शेवटी मुंबई इंडियन्स
सनरायजर्स हैदराबाद सहाव्या स्थानावर आहे. त्यांनी ३ सामने खेळले आहेत. केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. पंजाब किंग्स सातव्या स्थानावर आहे. त्यांनी ३ पैकी एक सामना जिंकला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ सामने खेळलेत त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. यानंतर दिल्लीचा नंबर लागतो. त्यांना ४ पैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आहे. मुंबईने ३ सामने खेळले त्या तीनही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.