Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीKedarnath Badrinath temple : शिव आणि विष्णूभक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच उघडणार केदारनाथ-बद्रीनाथचे...

Kedarnath Badrinath temple : शिव आणि विष्णूभक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच उघडणार केदारनाथ-बद्रीनाथचे दरवाजे

केदारनाथ धाम दर्शनाला कसे जायचे?

डेहराडून : भारतात हिंदूंसाठी धार्मिक महत्त्व (Hindu Religion) असलेल्या मंदिरांपैकी केदारनाथ आणि बद्रीनाथ ही महत्त्वाची मंदिरे (Kedarnath Badrinath temple) आहेत. केदारनाथ हे शंकराचे (Lord Shiva) मंदिर तर बद्रीनाथ हे विष्णूचे (Lord Vishnu) मंदिर आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) असलेली ही दोन्ही मंदिरे हिवाळ्यात ६ महिने बंद असतात. त्यामुळे शिव आणि विष्णूभक्तांना या मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडण्याची उत्सुकता लागून राहते. याबाबत एक आनंदाची बातमी आहे. या दोन्ही मंदिरांचे दरवाजे पुन्हा उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा श्री केदारनाथ धामचे दरवाजे १० मे रोजी सकाळी ७ वाजता उघडतील. तर १२ मे २०२४ रोजी सकाळी ६ वाजता ब्रह्म मुहूर्तावर बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातील. हिवाळ्यात मंदिर ६ महिने बंद असते. या महिन्यांत श्री हरी विष्णू विश्रांतीसाठी येथे वास्तव्य करतात असे मानले जाते.

समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी पंचमुखी डोली श्री केदारनाथ धामसाठी रवाना होणार आहे. यानंतर विविध थांब्यांवरून ती ९ मे रोजी सायंकाळी केदारनाथ धाम येथे पोहोचेल. दर्शनासाठी तुम्ही नोव्हेंबरपर्यंत प्रवासाला जाऊ शकता. कारण यानंतर केदारनाथ धाम ६ महिने बंद आहे. गेल्या वर्षी केदारनाथ धामचे दरवाजे २५ एप्रिल २०२३ रोजी उघडण्यात आले होते आणि ते १५ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद करण्यात आले होते.

केदारनाथ धाम दर्शनाला कसे जायचे?

रेल्वेने – केदारनाथचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे. केदारनाथपासून ऋषिकेश रेल्वे स्टेशन २१६ किलोमीटर अंतरावर आहे.

रस्त्याने – उत्तराखंडमधील डेहराडून, ऋषिकेश, हरिद्वार, पौरी, टिहरी, उत्तरकाशी, श्रीनगर आणि चमोली या प्रसिद्ध ठिकाणांहून गौरीकुंडला जाण्यासाठी बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध आहेत.

गौरीकुंड राष्ट्रीय महामार्ग १०९, जो रुद्रप्रयाग ते केदारनाथला जोडतो.

हवाई मार्गे – केदारनाथचे सर्वात जवळचे विमानतळ जॉली ग्रांट आहे जे २३८ किलोमीटर अंतरावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -