Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीस्मगलिंग केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून वाशीतील व्यक्तीकडून उकळले ८० लाख रुपये

स्मगलिंग केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून वाशीतील व्यक्तीकडून उकळले ८० लाख रुपये

अज्ञात सायबर टोळीचा पोलिसांकडुन शोध सुरु

नवी मुंबई(प्रतिनिधी): सायबर क्राईमचे पोलीस, आरबीआय, ईडी, फायनान्स मिनीस्ट्रीचे अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने वाशीमध्ये राहणाऱया एका ६३ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला त्यांच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये स्मग्लींगचे साहित्य असल्याचे सांगून सदर प्रकरणात त्यांना अटक करण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून तब्बल ८० लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळी विरोधात फसवणुकीसह बनावटगीरी तसेच आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या टोळीचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरीक वाशी सेक्टर-२९ मध्ये राहण्यास असून गत आठड्यामध्ये या व्यक्तीला सायबर टोळीने फेडेक्स पार्सल डिलिव्हरी कंपनी मधून बोलत असल्याचे भासवून संपर्क साधला होता. तसेच त्यांच्या नावाने त्यांच्या कंपनीकडे आलेल्या पार्सलमध्ये स्मग्लींगचे साहित्य आढळून आल्यामुळे त्याबाबत सायबर क्राईम पोलिसांकडे त्यांची तक्रार करण्यात आल्याचे सांगून त्यांना भीती घातली होती.

त्यानंतर सायबर टोळीतील इतर गुन्हेगारांनी सायबर क्राईम विभागाकडुन बोलत असल्याचे भासवून स्काईप ऍपद्वारे या ज्येष्ठ नागरिकाला संपर्क साधला. त्यानंतर सायबर टोळीने या ज्येष्ठ नागरिकाला आरबीआय, ईडी व फायनान्स मिनीस्ट्रीचे बनावट पत्र पाठवून त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याची व त्यात त्यांना अटक करण्याची धमकी दिली.

त्यानंतर या कारवाईपासून वाचण्यासाठी तसेच त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची संपत्ती व्हेरीफिकेशन करण्याच्या नावाखाली त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्याकडुन टप्प्या टप्प्याने एकुण ८० लाख रुपये उकळले. त्यानंतर या टोळीने आपले मोबाईल फोन बंद करुन टाकल्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे या ज्येष्ठ नागरीकाला लक्षात आल्यानंतर त्यांनी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी या प्रकरणातील टोळीचा शोध सुरु केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -