Saturday, July 5, 2025

Mobile Phone: मोबाईल उशीच्या खाली ठेवून झोपता का? तर हे जरूर वाचा

Mobile Phone: मोबाईल उशीच्या खाली ठेवून झोपता का? तर हे जरूर वाचा
मुंबई: संशोधनातून समोर आले आहे की दिवसांतून दोन ते तीन तास फोन वापरल्यास कोणतीही समस्या होणार नाही. मात्र त्यापेक्षा अधिक स्क्रीन टाईम वापरल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. रात्री झोपण्याच्या वेळेस मोबाईल फोन दूर ठेवला पाहिजे.

आजकाल प्रत्येक वेळेस मोबाईल आपल्यासोबत असतो. मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत दिवसभर ते डोळे फोनमध्येच व्यस्त असतात. मात्र याचा आरोग्यावर खराब परिणाम होत आहे. मोबाईलचे रेडिएशन आपल्या मेंदूवर परिणाम करतात. यामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढतो. इतकंच की ब्रेन कॅन्सरही होऊ शकतो.

आरोग्य तज्ञांच्या मते यापासून बचावासाठी स्मार्टफोनचा वापर कमी करावा लागेल. तर रात्री झोपताना डोक्याच्या जवळ अथवा उशीच्या खाली मोबाईल ठेवून झोपू नये.

WHOनुसार स्मार्टफोनमधून निघणारे आरएफ रेडिएशन ब्रेन कॅन्सर म्हणजेच ग्लिओमाचा धोका वाढवत आहेत. मोबाईल फोनमधून निघणारे आरएफ रेडिएशन मेंदूचा रिअॅक्शन टाईम, स्लीप पॅटर्न आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर चुकीचा परिणाम करतात.

तसेच मोबाईल फोन सातत्याने पँटच्या खिशात ठेवल्याने इन्फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमतेलाही नुकसान होते. जर दिवसातून दोन ते तीन तास फोन वापरला तर अनेक समस्यांपासून वाचता येते. अधिकचा स्क्रीन टाईम गंभीर आजार निर्माण करू शकतात.

झोपताना फोन दूर ठेवला पाहिजे. तसेच झोपण्याच्या कमीत कमी एक तास आधी फोनचा वापर केला नाही पाहिजे.
Comments
Add Comment