मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीला घरामध्ये आरसा लावताना दिशेबाबत खूप लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरात आरसा अथवा दर्पण लावला असेल तर तो योग्य दिशेला लावणे गरजेचे असते.
खरंतर, घरात चुकीच्या दिशेला लावलेला आरसा तुमच्यासाठी समस्येचे कारण बनू शकतो. वास्तुशास्त्रानुसार आरसा कधीही पश्चिम अथवा दक्षिण दिशेच्या भितींवर लावू नये.
वास्तुशास्त्रानुसार जर या दिशेला आरसा असेल तर घरात वाद निर्माण होऊ शकतात.
या दोन्ही दिशांना लागलेला आरसा घरात नकारात्मक वातावरण निर्माण करतात. तसेच यामुळे आर्थिक तंगीही निर्माण होते.
वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी आरसा पूर्व अथवा उत्तर दिशेला असला पाहिजे.
वास्तुनुसार जर घरात पूर्व अवा उत्तर दिशेला आरसा लावला असेल तर त्या घरात सकारात्मकता राहील. कायम आनंद नांदत राहील.
घरात कधीही तुटलेला आरसा ठेवू नये. आरसा तुटल्यास तो लगेचच फेकून द्यावा. नाहीतर यामुळे निगेटव्ह एनर्जी वाढेल.