
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२४च्या हंगामात मुंबई इंडियन्स(MI)ने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. फ्रेंचायजीने या हंगामात ५ वेळा खिताब जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला हटवत स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. यानंतर संघाची कामगिरी काही चांगली होत नाही आहे.
मुंबईच्या संघाला या हंगामात सुरूवातीच्या तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सोबतच कर्णधार पांड्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. याकच मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने एक मोठा निर्णय घेतला.
सुपरमॅनच्या वेशात दिसला ईशान
मॅनेजमेंटने ईशान किशनसह २-३ खेळाडूंना वेगळ्याच अंदाजात शिक्षा दिली. सोबतच फ्रेंचायजीने याचा व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मॅनेजमेंटने आपल्या खेळाडूंसाठी एक अनोखा ड्रेस बनवला आहे. हा सुपरमॅन आऊटफिट आहे जो इशानने घातला आहे.
𝑷𝒖𝒏𝒊𝒔𝒉𝒎𝒆𝒏𝒕 𝒐𝒖𝒕𝒇𝒊𝒕 𝒊𝒔 𝒃𝒂𝒄𝒌! Find out who arrived late this time 😉➡️ https://t.co/2xqgOxuNDy
Watch the full #MIDaily now on our website & the MI app 🎥#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/72tkNwb0vh
— Mumbai Indians (@mipaltan) April 3, 2024
इशानचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते मात्र त्याच्या या लूकने हैराण झाले की त्याने हा ड्रेस का घातला. आता याचे खरे कारण समोर आले. खरंतर, जर एखादा खेळाडू टीम मीटिंगसाठी उशिराने आला तर त्याला ही अशी शिक्षा दिली जाते.
या हंगामातील मुंबई इंडियन्सचा संघ
हार्दिक पांड्या(कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव(सुरूवातीच्या सामन्यातून बाहेर), इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेविड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, श्रेयस गोपाळ, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना मफाका.