कसा होणार फायदा; पाहा तुमची रास आहे का यात?
मुंबई : आपला मनासारखा दिवस जाण्यासाठी ग्रहांची साथ लाभणार की नाही हे जाणून घेण्यासाठी दैनंदिन किंवा साप्ताहिक राशिभविष्य पाहून अंदाज लावला जातो. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांकडून आजचा दिवस किंवा आठवडा कसा आहे हे राशिभविष्याच्या माध्यमातून सांगितलं जातं. त्यातच ज्योतिष शास्त्रानुसार ६ एप्रिलला ‘या’ राशीतील लोकांच भाग्य उजळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ज्योतिष अभ्यासकांकडून ६ एप्रिलला पूर्वभाद्रपद नक्षत्रमध्ये शनिचा (Shani Dev) गोचर राशीत प्रवेश होणार आहे. शनीचा प्रभाव काही राशींवर पडणार आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तर, याआधी शनि २४ नोव्हेंबरपासून शतभिषा नक्षत्रमध्ये गोचर केलं होतं. शनिचा हा गोचर काही राशींसाठी लाभदायी असणार आहे. त्या रास कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात.
- मेष रास (Aries Horoscope)
शनिचं हे ग्रहांचं संक्रमण मेष राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या दरम्यान या राशीला मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांच्या समस्या दूर होऊन सगळी थांबलेली कामेही पूर्ण होणार.
- वृषभ रास (Taurus Horoscope)
या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळेल. करिअरमधील प्रगतीबरोबरच तुमची लव्ह लाईफ देखील चांगली जाणार आहे. लग्नबंधनात येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. या दरम्यान तुम्हाला लग्नासाठी स्थळं देखील येऊ शकतात.
- कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीला गेल्या अनेक दिवसांपासून ज्या समस्या जाणवत होत्य त्या लवकरच दूर होतील. या दरम्यान चुकूनही कोणाकडून कर्ज घेऊ नका. या काळात तुमच्या सुख आणि समाधानात भर पडणार आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन मार्ग मोकळे होतील. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध अधिक घट्ट होतील.
- धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल. तर, ज्या लोकांनी नवा व्यवसाय सुरु केला आहे त्यांच्या कामात चांगलं यश मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं संबंध चांगले राहील. या दरम्यान तुम्हाला चांगली बातमीही मिळू शकते.