काँग्रेस नेते आणि बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपात प्रवेश

  42

नवी दिल्ली : बॉक्सर विजेंदर सिंगने बुधवारी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला.


नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विजेंदर सिंग यांनी पक्षात प्रवेश केला.


त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्याकडून पराभव झाला.


पक्षात प्रवेश केल्यानंतर बोलताना विजेंदर म्हणाले की, "मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून जगभरातील खेळाडूंना ज्या प्रकारचा आदर मिळत आहे, ते कौतुकास्पद आहे. मी देशाच्या हितासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मला अधिकाधिक लोकांना मदत करायची आहे," असे सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर सांगितले.


२००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील ३८ वर्षीय मुष्टियोद्धा हा यश मिळवणारा पहिला भारतीय बॉक्सर होता. २००९ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०१० कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने कांस्य, तसेच २००६ आणि २०१४ कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक मिळवले आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. तसेच विजेंदर सिंहच्या येण्याने पक्ष आणखीन मजबूत होईल, असा विश्वास विनोद तावडे व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी