अग्निशमन दलाच्या १५ गाड्या दाखल; आगीवर नियंत्रण मिळेना
सोलापूर : सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली असून आगीचे अद्यापही कारण समजले नाही. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या दाखल झाल्या असूनही आगीवर नियंत्रण मिळालेले नाही.
सोलापूर अग्निशामक विभाग घटनास्थळी दाखल झाला असून आग विझविण्याचे त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कारखान्यात टॉवेल व कच्चा माल असल्याने आगीचा भडका कायम असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी त्याठिकाणी जमली आहे. ही आग पसरणार नाही, याची खबरदारी अग्निशामक विभागाकडून घेतली जात आहे.
आतापर्यंत लाखोंचा माल आगीत भस्मसात झाला आहे. पूर्णपणे आग विझायला आणखी काही तास लागणार असल्याचे अग्निशामक विभागप्रमुख केदार आवटे यांनी सांगितले