तैपेई: तैवानमध्ये सकाळी सकाळीच ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. यामुळे तेथील राजधानी तैपेई हादरली. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक शहरातील वीज गायब झाली आणि दक्षिण जपान आणि फिलिपाईन्सवरील बेटांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व तैवानमध्ये अनेक इमारतील खचल्या आहेत. दरम्यान, जिवितहानीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तैवान आणि ओकिनावा, जपान आणि फिलीपाईन्समध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आङे. तैवानमध्ये इंटरनेट बंद होण्याची सूचना देण्यात आली आहे. तैवान टेलिव्हिजन स्टेशन्सनी भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ हुआलिनमध्ये काही इमारती खचल्याचे फुटेज दाखवले. मीडियानेही सांगितले की काही लोक अडकले आहेत.
🚨BREAKING: 7.5 magnitude earthquake in Taipei, Taiwan just moments ago #earthquakepic.twitter.com/0GV5PWFwjz
— AJ Huber (@Huberton) April 3, 2024
भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलिनच्या पूर्व काऊंटी तटापासून दूर तैवान द्वीपच्या पूर्व किनाऱ्याच्या दिशेला होता. जपान हवामान एजन्सीच्या माहितीनुसार या भूकंपामुळे जपानच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यालगतच्या क्षेत्रांमध्ये ३ मीटरपर्यंत त्सुनामीच्या लाटा पोहोचण्याची शक्यता आहे.