का घेण्यात आला हा निर्णय?
मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL 2024) जोरदार चर्चा आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामात आतापर्यंत १४ सामने खेळवले गेले आहेत. प्रत्येक सामना रंगत असतानाच आयपीएलकडून आता मोठी अपडेट देण्यात आली आहे. ऐनवेळी आयपीएलच्या दोन सामन्यांच्या तारखांची अदलाबदल करण्यात आली आहे. राजस्थान आणि कोलकाता, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यातील सामना १६ एप्रिल रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. याआधी हा सामना १७ एप्रिल रोजी होणार होता. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
🚨 NEWS 🚨
KKR-RR, GT-DC games rescheduled.
Details 🔽 #TATAIPL https://t.co/O56PJaKKv4
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2024
सामन्याची वेळ बदलण्याचं कारण काय?
१७ एप्रिल रोजी देशभरात रामनवमी (Ramnavami) उत्साहात साजरी केली जाणार आहे. अशा स्थितीमध्ये सुरक्षा पुरवणं शक्य होणार नाही. पश्चिम बंगाल क्रिकेट असोशिएशनसोबत याबाबत बीसीसीआयचं (BCCI) बोलणंही झालं आहे. त्यामुळेच कोलकात्याचा १७ एप्रिल रोजी होणारा सामना आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. तर १६ एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचा दिवस बदलण्याचा निर्णय घेतला आहे.