मुंबई: स्किनकेअर रूटीन फॉलो करण्यासाठी अनेकजण या गोष्टीवर जोर देतात की रात्री झोपण्याआधी चेहरा जरूर स्वच्छ केला पाहिजे. यामुळे दिवसभरातील धूळ, माती स्वच्छ होते. सकाळी चेहरा स्वच्छ धुतल्याने दुसऱ्या दिवशीसाठी तयार होतो. तर रात्रीच्या वेळेस चेहरा साफ केल्याने मेकअप आणि चेहऱ्यावरील अशुद्धी दूर होते.
फेसवॉश वापरण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी सगळ्यात आधी फेस वॉशचा वापर केल्यास त्वचा ताजीतवानी आणि टवटवीत होण्यास मदत होते. यामुळे रात्रभर चेहऱ्यातून झिरपणारे अतिरिक्त तेल स्वच्छ होण्यास मदत होते. सकाळी चेहरा साफ केल्याने केवळ रात्री लावलेले स्किनकेअर प्रॉडक्टस साफ होण्यास मदत होते.
सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेस स्किनकेअर रूटीनमध्ये फेस वॉश सामील केल्याने त्वचेला साफ संतुलित आणि निरोगी राखण्यास मदत मिळते. दरम्यान, यासाठी फेसवॉश निवडताना काही काळजी घेणे गरजेचे असते.