कणकवली : ऐन निवडणुकीच्या तोंडावर कणकवलीत बिडवाडी येथील उबाठा सेनेचे माजी शाखाप्रमुख पांडुरंग मगर व रामचंद्र घाडी यांनी आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे व संदेश सावंत यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केल्याने उबाठा सेनेला हा धक्का मानला जात आहे.
यावेळी संदेश सावंत, मनोज रावराणे, सुरेश सावंत, संदीप सावंत, सरपंच पुजा चव्हाण, अनुष्का चव्हाण, प्रशांत चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, आनंद साटम, संजय साळसकर, अनंत मगर, रवींद्र तेली, रमेश जांबवडेकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.