पाहा कोणते उमेदवार भरणार अर्ज?
मुंबई : लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात (Lok Sabha Election Second Phase) लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरणे सुरु झाले आहे. आज अनेक महत्वाच्या नेत्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, अकोला, वर्धा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
- महायुतीच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीचे चर्चेचे गुऱ्हाळ आणि खलबते सुरू असतानाच, आज महाविकास आघाडीकडून संजय देशमुख हे शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. (Sanjay Deshmukh, Yavatmal-Washim Lok Sabha Constituency)
- बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता हजारो शेतकऱ्यांच्या सभेला तुपकर संबोधित करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पाच शेतकऱ्यांच्या साक्षीने अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेनेचं महायुतीचा उमेदवार म्हणून, आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Ravikant Tupkar and Prataprao Jadhav, Buldhana Lok Sabha Constituency)
- वर्धा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हासाठी माजी आमदार अमर काळे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. (Amar Kale, Wardha Lok Sabha Constituency)
- परभणी लोकसभा मतदारसंघात काल महायुतीकडून रासपचे महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, आज महाविकास आघाडीकडून उबाठा सेनेचे खासदार संजय जाधव हे अर्ज दाखल करणार आहेत. (Sanjay Jadhav, Parbhani Lok Sabha Constituency)